पेडण्यात समाजोन्नती संघटनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

👇Click and Listen

पेडण्यात समाजोन्नती संघटनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

पेडणे (प्रतिनिधी) : समाजोन्नती संघटना पेडणे शाखेतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नुकतीच पेडणे येथे उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संघटनेचे पेडणे शाखाध्यक्ष विशांत कोरगांवकर यांनी भूषवले होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून भारत बेतकेकर, महेश चव्हाण तर खास निमंत्रित म्हणून अवित बगळी यांची उपस्थिती लाभली होती.

या वेळी बोलताना भारत बेतकेकर, अवित बगळी व महेश चव्हाण यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा गौरव करत त्यांच्या समाजहितासाठी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमात रोशन कोरगांवकर व हनुमंत पालयेकर या कलाकारांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पाहुण्यांचे स्वागत विनिता कोरगांवकर व दीप्ती कुडाळकर यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ध्रुव कुडाळकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रभाकर आसोलकर यांनी केले.

फोटो कॅप्शन : समाजोन्नती संघटनेतर्फे रोशन कोरगांवकर आणि हनुमंत पालयेकर यांचा सत्कार करताना भारत बेतकेकर, अवित बगळी, महेश चव्हाण.

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment