राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा; ११ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण

👇Click and Listen

राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा; ११ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण

मालवण, सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या पुढाकारातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऐतिहासिक किल्ले राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे अनावरण राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवार, ११ मे २०२५ रोजी करण्यात येणार आहे.

या पार्श्वभूमीवर आज राज्याचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री तसेच विद्यमान खासदार श्री. नारायण राणे यांनी किल्ले राजकोटला भेट देत पुतळ्याची पाहणी केली. यावेळी अनावरण सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतला गेला.

याप्रसंगी आमदार श्री. निलेश राणे, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी श्री. अनिल पाटील, प्रसिद्ध मूर्तिकार अनिल सुतार, भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच महायुतीचे विविध पदाधिकारी आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या अनावरण सोहळ्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाला नवे बळ मिळणार असून, छत्रपती शिवरायांचा इतिहास भावी पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने ही योजना महत्त्वाची ठरणार आहे.

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment