सिंधुदुर्ग जिल्ह्यात सागरी विकास योजनांचा आढावा : मालवण बंदर परिसराच्या विकासाला गती
ओरोस (सिंधुदुर्ग) – आज जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस येथे महाराष्ट्र सागरी मंडळाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध सागरी विकास योजनांवर सकारात्मक चर्चा झाली.
बैठकीत मालवण बंदर जेटी परिसरातील स्टॉल धारकांच्या प्रलंबित समस्यांवर तोडगा काढण्यात आला असून, बंदर परिसराचे सुशोभिकरण करण्यासंदर्भात महत्त्वाचे निर्देश देण्यात आले. यासोबतच मालवण-दांडी प्रोमिनाड तसेच खाडी अंतर्गत प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
या आढावा बैठकीस माजी मंत्री तथा आमदार श्री. दीपक केसरकर, मंत्री श्री. नितेश राणे, आमदार श्री. निलेश राणे, जिल्हाधिकारी श्री. अनिल पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सागरी विकासाच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली असून जिल्ह्यातील पर्यटन, रोजगार आणि स्थानिक विकासाला यामुळे चालना मिळणार आहे.










