सिंधुदुर्गात शिवतेजाची भव्य साक्ष: 93 फूट उंच शिवप्रतिमेचे पूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते

👇Click and Listen

सिंधुदुर्गात शिवतेजाची भव्य साक्ष: 93 फूट उंच शिवप्रतिमेचे पूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते

सिंधुदुर्ग : राजकोट, सिंधुदुर्ग येथील भव्य छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या परिसराची पाहणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच केली. या कार्यक्रमात पुतळ्याचे विधिवत पूजन व दर्शनही त्यांच्याहस्ते पार पडले.

या पुतळ्याची उंची 60 फूट असून, तलवारीसह ही उंची 83 फूट होते. जमिनीपासून संपूर्ण रचनेची उंची 93 फूट असून, या पुतळ्याचे किमान आयुर्मान 100 वर्षे असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

या महत्वपूर्ण कार्यक्रमास राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री नितेश राणे, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खासदार नारायण राणे, आमदार कालिदास कोळंबकर, दीपक केसरकर, रविंद्र चव्हाण, निलेश राणे, निरंजन डावखरे व इतर मान्यवर उपस्थित होते.

या पुतळ्याच्या निर्मितीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाला चालना मिळणार असून, शिवप्रेमींसाठी हे स्थळ एक प्रेरणादायी ठिकाण ठरणार आहे.

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment