सीजफायर मागील भारताची रणनीती आणि उद्दिष्टे
भारताने पाकिस्तानविरुद्ध झालेल्या संघर्षानंतर सीजफायरची घोषणा केली आहे. मात्र ही घोषणा म्हणजे माघार नसून, एका दूरदृष्टीच्या रणनीतीचा भाग आहे. यामागे भारताचे अनेक महत्त्वाचे उद्दिष्टे साध्य झाली आहेत.
1. ‘मेक इन इंडिया’चा प्रभाव जागतिक स्तरावर दाखवला
भारताने या संघर्षात स्वतः विकसित केलेली शस्त्रे आणि तंत्रज्ञान वापरले. या माध्यमातून भारताने जागतिक पातळीवर आपली सामरिक क्षमता सिध्द केली. हे ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे यश आहे. याच माध्यमातून भारत भविष्यात शस्त्रास्त्रांची मोठ्या प्रमाणावर निर्यात करणारा देश बनणार आहे. अंदाजे दोन लाख कोटी रुपयांची शस्त्रास्त्र निर्यातीचे उद्दिष्ट भारताला अपेक्षित आहे, यामुळे अर्थव्यवस्थेला भक्कम बळ मिळेल.
2. घुसखोरीविरुद्ध कठोर कारवाई
या संघर्षाचा परिणाम देशांतर्गत सुरक्षेवरही झाला. देशात अवैधरीत्या वास्तव्य करणारे बांगलादेशी आणि पाकिस्तानी नागरिक यांच्यावर सरकारने कठोर कारवाई सुरू केली आहे. अनेक ठिकाणी हे लोक पकडले गेले असून त्यांना देशाबाहेर पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. याआधी सीएएविरोधात “कागज नहीं दिखाएंगे” अशी आंदोलने झाली होती. पण आता परिस्थिती बदलली असून “कागज दाखवणे” ही गरज बनली आहे.
3. पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव
भारताने पाकिस्तानवर थेट युद्ध न करताही राजनैतिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा दबाव निर्माण केला आहे. पाकिस्तानने अण्वस्त्रधारी देश म्हणून स्वतःची प्रतिमा निर्माण केली होती. पण भारताने आता त्या अणुशक्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जागतिक जनमत तयार करण्याचे काम सुरू केले आहे. भारतातील सर्वपक्षीय प्रतिनिधीमंडळे जगभर फिरून पाकिस्तानच्या अण्वस्त्रांच्या धोक्यांविषयी जनजागृती करत आहेत.
4. पाकिस्तानच्या अंतर्गत विघटनाची रणनीती
भारत युद्धाऐवजी एका व्यापक रणनीतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. पाकिस्तानला आतून अस्थिर करण्यासाठी, त्यातील दहशतवादी संघटनांचा समूळ नाश करण्याचा उद्देश आहे. या दृष्टीने सध्याचा सीजफायर हा एक प्रकारचा विश्रांतीचा टप्पा आहे — ज्यामध्ये भारत आपल्या पुढील डावांची आखणी करत आहे.
5. राजकीय विरोधकांचा गैरसमज
काही विरोधी पक्षांचे नेते या सीजफायरला माघार मानून सरकारवर टीका करत आहेत. मात्र हे नेते भारताच्या परराष्ट्र धोरणाची आणि संरक्षण रणनीतीची अर्धवट माहिती घेऊन विधान करत आहेत. अशा वेळी राजकारण न करता देशहितासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. मोदी सरकारवर टीका करण्याची सवय काही जणांना लागली आहे, पण देशहित हे प्रत्येक पक्षासाठी सर्वोच्च असावे.
सीजफायर ही एक राजनैतिक आणि सामरिक रणनीती आहे. यामागे भारताने आपली क्षमता दाखवली, सुरक्षा मजबूत केली, आणि पाकिस्तानविरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रभावी दबाव तयार केला. अशावेळी विरोधाऐवजी एकतेचा संदेश देणे हेच खरे राष्ट्रप्रेम ठरेल.










