भावपूर्ण श्रध्दांजली
गोवा टिव्ही २४ न्यूज तर्फे
अश्रूंत निघून गेली एक उमदी कवडसी…
दुःखद निधन
समृद्धी गुरुदास वायंगणकर
(वय २५, खोर्ली – म्हापसा)
आज सकाळी गोमॅको रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असताना समृद्धी वायंगणकर हिने अखेरचा श्वास घेतला. कोलवाळ पुलावर झालेल्या दुर्दैवी अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर तिच्यावर उपचार सुरू होते. दुचाकीस्वार सिद्धाली महाले ही अपघातात जखमी झाली होती.
समृद्धी या माजी नगरसेवक गुरुदास वायंगणकर व शुभांगी वायंगणकर यांची कन्या होत्या.
त्यांच्यावर आज दुपारी ४.३० वा. खोर्ली स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
गोवा टिव्ही २४ न्यूज परिवारातर्फे
समृद्धी वायंगणकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली
आणि कुटुंबीयांना या दु:खद प्रसंगी
सांत्वन व धैर्य मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
गोवा टिव्ही २४ न्यूज










