ब्रह्मोसच्या स्ट्राइकचा दणका केवळ चीन, तुर्की व पाकिस्तानलाच नाही, तर देशातील गद्दार व विरोधकांनाही बसला!
म्हापसा : ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने केलेल्या ब्रह्मोस मिसाईल हल्ल्याने पाकिस्तानच्या ११ हवाई तळांचा विध्वंस केला, तुर्की व चीनच्या बनावटीच्या डिफेन्स सिस्टिमला धुळ चारली, पण याच हल्ल्याचा आणखी एक प्रभाव स्पष्टपणे जाणवतोय – तो म्हणजे भारतातील गद्दार मानसिकता असलेले गद्दार आणि काही राजकीय विरोधकांवर बसलेला मानसिक ब्रह्मोत्सा दणका!
जेव्हा भारताने निर्णायक सैनिकी कारवाई केली, तेव्हा देशाच्या एकतेचा उत्सव साजरा व्हायला हवा होता. पण दुर्दैवाने काही विचारधारा आणि विरोधी गटांनी भारताच्या या यशाला कमी लेखण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानचा बचाव करणारी वक्तव्यं, सैन्य कारवाईवर प्रश्नचिन्ह, आणि देशविरोधी नैरेटिव्ह चालवणारे सुर… हे सर्व जणू ब्रह्मोसच्या आवाजाने घाबरले आहेत की काय?
भारताच्या विजयाने जागा झाला ‘भारतातला पाकिस्तान’
भारतीय सेनेने जेव्हा पाकिस्तानच्या आत घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले, तेव्हा फक्त सीमापारचा पाकिस्तानच नव्हे, तर देशात दडलेला ‘आतला पाकिस्तान’ही अस्वस्थ झाला. याच ‘गद्दारांच्या प्रतिक्रिया पाहता, देशहितापेक्षा राजकारणाला आणि विरोधासाठी विरोधाला त्यांनी प्राधान्य दिल्याचे दिसते.
राजकीय टीका की मानसिक पराभव?
काही विरोधी नेत्यांनी ऑपरेशन सिंदूरवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना भारतीय सेनेच्या क्षमतेवर अप्रत्यक्षरित्या अविश्वास दाखवला. हा केवळ टीकेचा भाग नसून, ब्रह्मोसच्या प्रभावाने झालेले त्यांचे मानसिक पराभवाचे लक्षण मानले जात आहे. देशातल्या सामान्य जनतेने मात्र यावर रोष व्यक्त केला असून, सोशल मीडियावर ‘देशविरोधी मानसिकतेला ब्रह्मोससारखा उत्तर द्या’ असा सूर उमटत आहे.
शत्रूच्या मदतीला तयार असलेली विचारधारा धोकादायक
भारताने सैनिकी प्रगती केली की काही मंडळींना अस्वस्थता का वाटते? याचे उत्तर त्यांच्या विचारसरणीत आहे. देशाच्या यशातही ज्यांना तटस्थता नव्हे तर द्वेष दिसतो, त्या मानसिकतेचा पर्दाफाश ब्रह्मोसच्या धडाक्याने केला आहे. या मंडळींना आता जनतेच्याही ब्रह्मोससारख्या प्रश्नांचा सामना करावा लागणार आहे.
ब्रह्मोसने पाकिस्तानमधील तळ उध्वस्त केले खरे, पण त्याचवेळी देशातील देशविरोधी प्रवृत्तींनाही जोरदार हादरा दिला आहे. भारतीय सेनेचा विजय हा फक्त सीमारेषेपुरता मर्यादित नाही – तो देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठीही अत्यंत महत्त्वाचा संदेश आहे. आता देशाला गरज आहे ब्रह्मोससारख्या निर्धाराची – बाह्य शत्रूंना आणि अंतर्गत विघातक प्रवृत्तींना रोखण्यासाठी!
– गोवा टीव्ही न्यूज










