भारतीय सेनेच्या पराक्रमावर विश्वास नाही, पण पाकिस्तानच्या बोलण्यावर विश्वास; दुर्दैवी राजकारणाची शोकांतिका!
म्हापसा: २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण आ’तं’की हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमध्ये (PoK) आं’त’की’ ठिकाणांचा नायनाट करण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. या ऑपरेशनने हादरलेल्या पाकिस्तानने भारतावर थेट हल्ला चढवला. चार दिवस चाललेल्या संघर्षात पाकिस्तानने ८०० ते १००० ड्रोन आणि क्षेपणास्त्रे भारतातील ३० शहरांवर डागली, मात्र भारतीय सशस्त्र दलांनी सर्व हल्ले निष्फळ ठरवले. कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झाली नाही हे भारतीय सेनेच्या पराक्रमाचेच प्रतीक आहे.
भारतीय सैन्याच्या तीनही विभागांच्या संचालन महासंचालकांनी (DGMOs) पत्रकार परिषद घेऊन पाकिस्तानने वापरलेले ड्रोन व क्षेपणास्त्रांचे अवशेष माध्यमांसमोर ठेवले. यात तुर्कीचे ड्रोन व चीनच्या PL-15E मिसाइलचाही समावेश असल्याचे उघड झाले. PL-15E ही दीर्घ पल्ल्याची, हवाई टप्प्यात मार करणारी अत्याधुनिक क्षेपणास्त्र असून तिचे अवशेष पंजाबमध्ये सापडले.
या पार्श्वभूमीवर जपान, फ्रान्स आणि ‘फाइव आयज’ गटातील गुप्तचर संस्था भारताकडून या मिसाइलचे अवशेष मागत आहेत, कारण या क्षेपणास्त्राची माहिती चीनच्या संरक्षण क्षमतांचा भेद उघड करू शकते. फ्रान्सला PL-15E ही आपल्या मेटिओर क्षेपणास्त्रासाठी थेट धोका वाटत असून त्यामुळे त्यांचे वैज्ञानिक हे अवशेष अभ्यासण्यासाठी उत्सुक आहेत.
पण या साऱ्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत दुर्दैवी आणि लज्जास्पद बाब पुढे येते — ती म्हणजे भारतातील काही राजकीय पक्ष आणि विचारवंत गंधार यांनी आपल्या देशाच्या सेनेच्या पराक्रमावर शंका घेत पाकिस्तानच्या नेत्यांच्या वक्तव्यांवर विश्वास ठेवणे. भारतीय जवानांनी देशासाठी प्राण पणाला लावले, शत्रूच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाला निष्क्रीय केले, तरीही आपल्याच देशात त्यांच्या बोलण्यावर विश्वास न ठेवता विरोधक आणि तथाकथित विचारवंत परकीय शत्रूच्या प्रचाराला महत्त्व देतात हे भारताच्या लोकशाहीसाठी अपमानास्पद आणि खंतजनक आहे.
देशाच्या रक्षणासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या जवानांचे मनोबल वाढवणे, त्यांचा गौरव करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. अशावेळी राजकारण न करता देशहिताला प्राधान्य देणे अत्यंत आवश्यक आहे.
भारताने जे साध्य केले आहे, ते केवळ सैनिकी विजय नाही तर एक जागतिक सामरिक संदेश आहे. भारत कधीच झुकणार नाही. पण या विजयाला कमी लेखणारे स्वदेशी आवाज हेच आज भारताच्या एकतेला खरी बाधा ठरू शकतात.










