काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा गिरीष चोडणकर यांच्या क्षमता व कार्यप्रणालीवर विश्वास

👇Click and Listen

काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा गिरीष चोडणकर यांच्या क्षमता व कार्यप्रणालीवर विश्वास

नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष मा. मल्लिकार्जुन खर्गे यांनी हरियाणा आणि मध्य प्रदेशसाठी एआयसीसी निरीक्षकांच्या नियुक्तीस तात्काळ प्रभावाने मंजुरी दिली आहे. ही नियुक्ती पक्षाचे संघटन बळकट करण्यासाठी आणि जिल्हा काँग्रेस कमिटी (DCC) अध्यक्षांच्या निवडीसाठी सुरू असलेल्या संगठन सृजन अभियानाचा भाग आहे.

या अभियानांतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या निरीक्षकांमध्ये काँग्रेस कार्यकारिणी समितीचे (CWC) सदस्य आणि माजी गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे (GPCC) अध्यक्ष श्री. गिरीश चोडणकर यांची हरियाणासाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, श्री. चोडणकर यांची गुजरातसाठीही याच अभियानांतर्गत आधीच निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे.

या नियुक्त्या तात्काळ प्रभावाने लागू होत असून काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक मजबुतीसाठी आणि स्थानिक नेतृत्व घडवण्यासाठी महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment