वावटी-वाठादेव रस्त्याचे व संरक्षक भिंतीचे लोकार्पण आमदार प्रेमानंद शेट यांच्या हस्ते
मध्ये : मये मतदारसंघातील वावटी-वाठादेव येथे मुख्य रस्त्यापासून निरंकारी घुमटीपर्यंतच्या मार्गाच्या डांबरीकरण व संरक्षक भिंतीच्या बांधकामाचे लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. या लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन आमदार प्रेमानंद शेट यांच्या हस्ते संपन्न झाले.
या कार्यक्रमास श्री. शंकर चोडणकर (अध्यक्ष, उत्तर गोवा जिल्हा पंचायत), श्री. महेश सावंत (सदस्य, उत्तर गोवा जिल्हा पंचायत), सौ. दिव्या द नाईक (उपसरपंच, कारापूर-सर्वण), सौ. अंजली च्यारी (उपसरपंच, मावळिंगे-कुडचिरे), श्री. सीताराम काशिनाथ सावंत (अध्यक्ष, श्री श्यामपुरुष देवस्थान, सर्वण) तसेच सर्व पंच सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार प्रेमानंद शेट यांनी सांगितले की, “ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास हेच आमचे उद्दिष्ट असून, मूलभूत सुविधांमध्ये रस्ते व संरक्षणाची कामे ही अत्यंत महत्त्वाची आहेत. ग्रामस्थांच्या मागणीनुसार हे काम पूर्ण करण्यात आले असून, भविष्यातही अशा विकासकामांसाठी प्रयत्न सुरू राहतील.”










