पंढरपूर येथे गोवा भवन उभारण्याच्या प्रस्तावास सरकारचा सकारात्मक पाठिंबा

👇Click and Listen

पंढरपूर येथे गोवा भवन उभारण्याच्या प्रस्तावास सरकारचा सकारात्मक पाठिंबा

संखाळी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर रवींद्र भवन संखाळी येथे अमोणा, नवेली आणि विठ्ठलापूर वारकरी संप्रदायाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या हरिपाठात सहभागी होऊन श्रद्धा व्यक्त केली.

दरवर्षी गोव्यातून अनेक दिंडी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी पायी वारी करतात. या पारंपरिक वारीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि गोमंतकीय भाविकांना पंढरपूर येथे सुविधा मिळाव्यात यासाठी गोवा भवन उभारण्याच्या प्रस्तावावर गोवा सरकार सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

“श्री विठ्ठल-रखुमाई सर्वांना शांतता, समृद्धी आणि आनंद देवो” असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी आपल्या शुभेच्छांमध्ये म्हटले.

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment