हातरसच्या सत्संग मैदानात चेंगराचेंगरीत 115 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी. हृदय पिळवटून टाकणारी घटना.
हातरस येथील सिकंदरराव ट्रॉमा सेंटरच्या बाहेर हृदय पिळवटून टाकणारे दृश्य होते. चेंगराचेंगरीत जीव गमावलेल्या आणि बेशुद्ध झालेल्या लोकांना रुग्णवाहिकांमध्ये आणण्यात आले, रुग्णवाहिका कमी पडू लागल्या त्यानंतर टेम्पो कार ऑटो जशा गाड्या उपलब्ध होत होत्या तसे लोक मृतदेह व जखमी लोकांना रुग्णालयात आणू लागले.
हातरस येथील पुलराई गावात मंगळवार (2 जुलै) हा अशुभ दिवस होता. भोले बाबा नावाच्या व्यक्तीच्या सत्संगात चेंगराचेंगरी झाली, या दुर्घटनेत आतापर्यंत 115 जणांचा मृत्यू झाला आहे. दुपारी दीडच्या सुमारास चेंगराचेंगरी झाली. स्वतःला नारायण साकार हरी उर्फ भोले बाबा म्हणवून घेणारे सत्संग करणारे बाबा भूमिगत आहेत. त्याच्याबद्दल काहीही सापडलेले नाही. मात्र, रात्री उशिरा यूपी पोलिसांनी ‘भोले बाबा’च्या शोधात मैनपुरी जिल्ह्यातील राम कुटीर चॅरिटेबल ट्रस्टमध्ये शोधमोहीम राबवली. आयजी शलभ माथूर यांनी सांगितले की, सत्संग आयोजकांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात येत आहे. दुसरीकडे सीएम योगी यांनी हातरस घटनेबाबत बैठक घेतली आहे. मुख्यमंत्री घटनास्थळी पाठवलेल्या तीन मंत्र्यांच्या सतत संपर्कात आहेत, मुख्य सचिव आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, या घटनेला जो कोणी जबाबदार असेल, त्याला सोडले जाणार नाही, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल.










