पश्चिम बंगालचे राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांनी दाखल केला, ममता बॅनर्जी विरोधात मानहानीचा खटला. 

👇Click and Listen

पश्चिम बंगालचे राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांनी दाखल केला, ममता बॅनर्जी विरोधात मानहानीचा खटला. 

पश्चिम बंगालचे राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांनी 28 जून रोजी ममता बॅनर्जी यांच्याविरोधात कोर्टात मानहानीचा खटला दाखल केला होता. या प्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कृष्ण राव यांच्या खंडपीठासमोर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात सुनावणी होणार आहे.

पश्चिम बंगालचे राज्यपाल सी.व्ही.आनंद बोस यांनी राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची विरोधात कोर्टात मानहानीचा खटला दाखल केले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात बदनामीचा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी बुधवारी दि. 3 रोजी त्यावर कलकत्ता उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

राज्यपाल आनंद बोस यांनी 28 जून रोजी ममता बॅनर्जी यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. एक दिवसापूर्वी, ममता बॅनर्जी यांनी दावा केला होता की, महिलांनी त्यांच्याकडे तक्रार केली होती की राजभवनात सुरू असलेल्या कामांमुळे ते तिथे जाण्यास घाबरतात.

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment