ग्रामसभेत ठराव मांडल्यानंतर अवघ्या दहा दिवसात अंमलबजावणी.
पेडणे (प्रतिनीधी )
मोरजी ग्रामपंचायत क्षेत्रात काम सुरू असून त्या कामाला ग्रामस्थांचा विरोध असल्याने त्यांनी आस्कावाडा मांद्रे येथून वाहतूक वळविली. दरम्यान आम्ही मोरजीतील स्थनिकांसोबत राहून त्यांना शक्य करण्याची मागणी ग्रामसभेत केल्यानंतर येथे रस्त्या शेजारी गटार उभारण्याचा ठराव ग्रामस्थांच्या मागणीनुसार संमत करण्यात आला. एवढ्या दहा दिवसात मांद्रे पंचायतीचे सरपंच प्रशांत उर्फ बाळा नाईक यांनी ग्रामसभेत ठरावाची अंमलबजावणी करून आपण लोकांसाठी काम करत असल्याचे दाखवून दिले.
मोरजी येथे सुरू असलेल्या प्रकल्पासाठी लागणारे साहित्य नेण्यासाठी मांद्रे आस्कवडा येथे मातीचा रस्ता तयार करून त्याचा वापर केला जात असल्याचे मांद्रे पंचायतीच्या ग्रामसभेत ग्रामस्थ यशवंत सावंत यांनी उघड केले होते. ते रोखण्यासाठी काय करणार यावर चर्चा झाल्यानंतर ग्रामस्थांनी गटार उभारण्याची सूचना देऊन ठराव संमत केला.
ग्रामसभेत होणाऱ्या चर्चेला महत्त्व असते आणि त्यावर कारवाई होते हे नाईक यांनी लोकांना दाखवून दिले. दरम्यान सरपंच नाईक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, ग्रामस्थ यशवंत सावंत यांनी हा विषय ग्रामसभेत मांडला होता. त्यानंतर आम्ही काय करू शकतो यावर चर्चा झाली आणि अखेर पावसाचे पाणी या रस्त्यावर येत असल्याचे येथे गटार उभारण्याचा ठराव ग्रामस्थांच्या सूचनांनुसार घेण्यात आला.
बॉक्स करणे
सरपंच काम करतात म्हणून मागणी होते : सावंत
मांद्रे पंचायतीचे सरपंच प्रशांत नाईक हे काम करतात म्हणून आम्ही त्यांच्याकडे कामाची मागणी करतो. जे काम करत नाही त्यांच्याकडे कुठलेच विषय घेऊन कुणीही जात नाही याचा अनुभव आम्ही घेतला आहे. कुणाच्याही दबावाला अजून बळी पडलेले नाहीत म्हणून नाईक यांच्या धाडसाचे कौतुक करावेसे वाटते. वाहतुकीसाठी सदर गटार जर बुजवले तर त्यावरही त्यांनी योग्य कारवाई करावी असे आवाहन मी त्यांना करू इच्छितो.










