सावंतवाडा उपआरोग्य केंद्र नूतनीकरणाचे सरपंच प्रशांत नाईकचे आश्वासन.
सावंतवाडा येथे मांद्रे पंचायतीची इमारत असून ती उपआरोग्य केंद्रासाठी भाड्याने दिली होती. गेली दोन वर्षे उप आरोग्य केंद्रातील कर्मचारी या इमारतीच्या नूतनीकरणाची मागणी करत होते मात्र अजूनही त्यावर कोणतीच कारवाई होत नसल्याने त्यांनी सरपंच प्रशांत उर्फ बाळा नाईक यांच्याकडे मागणी केल्यावर त्यांनी लवकरच नूतनीकरण करण्याचे आश्वासन दिले.
मांद्रे पंचायतीने उप आरोग्यकेंद्र केंद्र नूतनीकरण करण्यासाठी पंचायतीच्या बैठकीत ठराव संमत केला आहे. सरपंच नाईक यांना संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की प्रत्यक्ष पाहणी करायला गेलो असता तिथे इमारतीची परिस्थिती बिकट होती. या इमारतीत दररोज १५० हून अधिक लोकांची ये जा असते तसेच इथे कर्मचारी देखील कामावर आहेत.
येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले की, येथे भयानक अवस्था आहे या संबंधित पंच माजी सरपंच याना कळविले होते.
आम्हाला या इमारतीत काम करण्याची भीती वाटत आहे. त्यानंतर आता आम्ही विद्यमान सरपंच प्रशांत उर्फ बाळा नाईक यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आमचे गाऱ्हाणे मांडले असता त्यांनी लगेच याची दखल घेऊन इमारतीची पाहणी देखील केली आहे. या इमारतीत वाचनालय आणि उपआरोग्य केंद्र सुरू आहे.
इमारतीच्या छप्परवरील सिमेंट खाली कोसळत आहे तसेच शौचालय बांधकामवरील पाण्याची टाकी उघडीच आहे. येथील सेप्टिक टॅकही उघडीच असून यामुळे रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे. प्रत्यक्ष पहनिवेली सरपंच प्रशांत नाईक यांनी सांगितले की ही इमारत पंचायतीची असून गेल्या अनेक दिवसांपासून इमारत दुरूस्त करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी होती. लोकांच्या आरोग्याची काळजी हे कर्मचारी घेत अस्न त्यांची सुरक्षा आम्ही जपली पाहिजे आणि ही आवश्यकता ओळखून मी लवकरच इमारत दुरूस्त करण्याचे आश्वासन दिले. केवळ आश्वासन देऊन न थांबता त्यासाठी पंचायत बैठकीत ठराव देखील घेतला आहे.
प्रत्यक्ष पाहणीवेळी उपसरपंच तारा हडफडकर, पंच सदस्य चेतना पेडणेकर, संपदा आसगावकर उपस्थित होत्या.










