शैक्षणिक संस्थांना सरकारचे सर्वतोपरी सहकार्य : मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत. हरमल येथे नर्सिंग कॉलेजचे भूमिपूजन

👇Click and Listen

शैक्षणिक संस्थांना सरकारचे सर्वतोपरी सहकार्य : मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत. हरमल येथे नर्सिंग कॉलेजचे भूमिपूजन

पेडणे प्रतिनिधी

गोव्यात शैक्षणिक क्षेत्रात सरकार उल्लेखनीय कामगिरी करीत असून,माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सरकारमध्ये असताना अनेक योजना राबवल्या.त्यांच्या दूरगामी विचाराने हरमल पंचक्रोशी संस्थेचा उत्कर्ष होत आहे.सरकार वीद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व प्रगतीसाठी तत्पर असून,संस्थांना सर्वतोपरी सहकारी असेल,असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी केले.

ह्या भूमिपूजन सोहळ्यास केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक,जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशांवकर,माजी आमदार दयानंद सोपटे, जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ सुभाष वेलिंगकर,

संस्थेचे चेअरमन लक्ष्मीकांत पार्सेकर,संस्थेचे उपाध्यक्ष सूर्यकांत नाईक,सचिव सुधीर नाईक,संस्थेचे सल्लागार सुदन बर्वे,

सदस्य तथा हायस्कूलच्या मुख्याध्यापिका स्मिता पार्सेकर, कॉलेजचे प्राचार्य डॉ पांडुरंग पंडित, हायर सेकंडरीचे प्राचार्य शांभवी नाईक पार्सेकर,प्रा गोविंदराज देसाई ,प्रशासक प्रा उदेश नाटेकर,नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य कीरूबा उपस्थित होते.

हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या कॉलेज ऑफ नर्सिंगच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यात प्रमुख पाहुणे नात्याने बोलत होते.अलीकडे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आमूलाग्र परिवर्तन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.त्यादृष्टीने सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक नवीन धोरणाची अंमलबजावणी व प्रोत्साहन सुरू आहे.शिक्षणानंतर बेरोजगार असणे शक्य नसून,त्यांच्यासाठी धोरणात बदल अपेक्षित आहे.अलीकडे पॅकेज पद्धती असल्याने ,जास्त पॅकेज असल्यास संस्थेचे यश गृहीत होते,असे मुख्यमंत्री सावंत यांनी व्यक्त केले.

केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक –

हरमल पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे संस्थापक चेअरमन गणपत पार्सेकर यांची आठवण येते व त्याचे ज्ञानदानाचे स्वप्न पूर्ण होत असल्याचे दिसून येते. सद्याचे चेअरमन लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केलेल्या परिश्रमामुळे स्वप्नवत कार्य चालविले असून,निश्चितच ह्या गावात व राज्यात,ही संस्था उल्लेखनीय कामगिरी करीत राहील,असे केंद्रीयमंत्री नाईक यांनी व्यक्त केले.

चेअरमन लक्ष्मीकांत पार्सेकर –

केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांनी ह्या विद्या संकुलातील, हायस्कूलच्या इमारतीस खासदार निधीतून पंचवीस लाख दिले होते.त्यानंतर

पंचक्रोशी संस्थेने अल्पावधीत तीन इमारती उभारल्या.त्या हायर सेकंडरी इमारतिचे उद्घाटन मुख्यमंत्री व केंद्रीयमंत्र्यांनी केले होते व अल्पावधीत पूर्ण झाली,मोठी भरभराट झाली होती,त्यामुळे नर्सिंग कॉलेजचे भूमिपूजन मुख्यमंत्री व केंद्रीयमंत्र्याच्या उपस्थितीत होत असल्याने,तसे नर्सिंग कॉलेजची इमारत अल्पावधीतच पूर्ण होईल,असा विश्वास चेअरमन लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी व्यक्त केले.

यावेळी संस्थेचे सदस्य सलग सहा वेळा खासदार व केंद्रीयमंत्री झाल्याबद्दल श्रीपाद नाईक यांचा शाल, श्रीफळ ,मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन चेअरमन पार्सेकर हस्ते सत्कार करण्यात आला.सूत्र संचालन प्रा दीपक किंजवडेकर तर प्रा शमिका नर्से यांनी आभार मानले.

फोटो उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत,केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक ,माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व इतर

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment