पहिल्याच पावसात अयोध्या रामपथ कोसळला, अशा खोट्या व्हिडिओ बाबत यूपी पुलिस ऍक्टिव्ह. खोटे व्हिडिओ पसरविणाऱ्यांचा मास्टरमाईंड कोण?
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. पहिल्याच पावसात अयोध्या रामपथ कोसळला आणि त्यात एक महिला पडली. हा दावा खोटा असल्याचे अयोध्या पोलिसांचे म्हणणे असून याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे यूपी पुलिस ने सांगितलेले आहे, की दरम्यान अशा कृत्यांमध्ये जे कोणी सामील असतील, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे.
अयोध्येबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. व्हिडिओमध्ये दावा करण्यात आला आहे की, प्रथम कोटय़वधी खर्चून आयोध्यातील रामपत कोसळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल केला जात आहे. जो पहिल्याच पावसामध्ये कोसळल्याचा दावा केला जात आहे. त्यामध्ये एक महिला पडल्याचे वृत्त आहे. आता या व्हिडिओवर अयोध्या पोलिसांचे वक्तव्य आले आहे. हा व्हिडिओ पूर्णपणे दिशाभूल करणारा असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणी तिघांवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.










