सम्राट क्लब हळदोणा यांचा अधिग्रहण सोहळा संपन्न

👇Click and Listen

सम्राट क्लब हळदोणा यांचा अधिग्रहण सोहळा संपन्न

मापसा वार्ताहर : कला व संस्कृतीचा प्रचार होणे गरजेचे असून ते कार्यसम्राट क्लब उत्तमरीत्या निभावित आहे, असे प्रतिपादन संदीप निगळे यांनी सम्राट क्लब हळदोणा यांच्या अधिग्रहण सोहळ्यात प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना केले.

या शपथ ग्रहण सोहळ्याला खास अतिथी म्हणून प्राध्यापक संजीव शिरोडकर, सम्राट क्लब राज्य एक चे अध्यक्ष प्रवीण सबनीस, गटाध्यक्ष अधिकारी रवींद्र पणजीकर, मावळते अध्यक्ष रमाकांत अणवेकर, नवनिर्वाचित अध्यक्ष सर्वेश रायकर, सचिव रामा केरकर, खजिनदार मंगल हळदोणकर आदी उपस्थित होते. शपथ ग्रहण अधिकारी प्रवीण सबनीस यांनी सर्वेश रायकर व नूतन संचालक मंडळास अधिकार बहाल करून शुभेच्छा दिल्या. गटाध्यक्ष रवींद्र पणजीकर यांनी नवीन सदस्य देवेंद्र मावळणकर, सुदेश खलप, जयवंत माळवणकर, दियास नेतार्डेकर यांना शपथ दिली.

दिलीप हळदणकर यांनी परिचय तर अमेय देसाई यांनी ओळख करून दिली. सूत्रसंचालन गोपिकाबाई शिरोडकर यांनी केले. रामा केरकर यांनी आभार मानले.

संचालक मंडळ पुढील प्रमाणे माजी अध्यक्ष रमाकांत अनवेकर,  गंगाधर भोसले, उपाध्यक्ष अमेय देसाई,  दिलीप हळदणकर (क्लब विस्तार),  अमित शिंदे (जनसंपर्क), सत्वशीला म्हालदार (कार्यक्रम प्रमुख), सिद्धी रायकर (हिशोब तपासणीस), गोविंद पेडणेकर (क्लब मेंबरशिप),.

फोटो : सम्राट क्लब हळदोणा यांच्या अधिग्रहण सोहळ्यात प्राध्यापक संजीव शिरोडकर,  प्रवीण सबनीस, रविंद्र पणजीकर, रमाकांत अणवेकर,  सर्वेश रायकर आदी. ( छाया: भारत बेतकेकर)

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment