गोवा विद्यापीठात कविता सादरीकरण कार्यशाळा.

👇Click and Listen

गोवा विद्यापीठात कविता सादरीकरण कार्यशाळा.

दिनांक १४ ऑक्टोबर २०२४ रोजी गोवा विद्यापीठाच्या मराठी अध्ययनशाखेतर्फे गोवा मराठी अकादमीतर्फे प्रायोजित कविता सादरीकरण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत कवी नारायण खोर्जुवेकर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. कार्यशाळेच्या उद्घाटनसमयी गोवा विद्यापीठाच्या मराठी अध्ययनशाखेचे संचालक डॉ. विनायक बापट, कवी श्री. नारायण खोर्जुवेकर व कार्यशाळेच्या संयोजक प्रा. पूर्वा वस्त उपस्थित होते. डॉ. विनायक बापट यांनी आपल्या भाषणात गोवा मराठी अकादमीच्या स्तुत्य उपक्रमाद्वारे आभार व्यक्त केले तसेच कविता सादरीकरणाचे एक विशिष्ट तंत्र असल्याने विद्यार्थ्यांना कविता सादरीकरणाचे तंत्र कार्यशाळेतून समजेल व विद्यार्थ्याना कार्यशाळेचा लाभ होईल अशी आशा व्यक्त केली. कु. आयुष भोमकर यांनी मार्गदर्शकांचा परिचय केला. कार्यशाळेला मार्गदर्शक म्हणून लाभलेले कवी नारायण खोर्जुवेकर यांनी काव्य सादरीकरण तंत्राची ठळक वैशिष्ट्ये स्पष्ट करत स्वरचित कवितांचे प्रत्यक्ष सादरीकरण करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत मराठी अध्ययनशाखेतील विद्यार्थ्यांनी आपली कविता सादर केली. सहभागी विद्यार्थ्यांमध्ये गजानन गावस, प्राप्ती गावकर, वर्दिनी बोरकर, यशस्वी नाईक, खुशी खांडोळकर, खुशबू च्यारी, श्रेया मोरजकर यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. आरती चंद्रेकर यांनी केले. व आभार प्रदर्शन कु. साक्षी डेगवेकर यांनी केले.

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment