आश्रय दिवाळी अंकाचे सभापतींच्या हस्ते प्रकाशन सोहळा.
गोवा विधासभेचे सभापती श्री. रमेश तवडकर यांच्या हस्ते आश्रय फाऊंडेशन आणि कल्चरल असोसिएशनच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
आश्रय फाऊंडेशन तर्फे संगीता सभागृह, नोनूज व्हिलेज, माशेल येथे हा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी व्यापीठावर श्री. लक्ष्मण रायकर (उद्योजक) कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याशिवाय व्यासपीठावर श्री. गोविंद विष्णू भगत (विभाग प्रमुख प्रशिक्षण विभाग सरकारी तंत्रनिकेतन, पणजी), श्री. सुनिल भोमकर (माजी सरपंच व विद्यमान पंच, भोम-अडकोण) व सौ. अपर्णा सं. आमोणकर (स्थानिक पंच, तिवरे, वरगांव.) उपस्थित होते.
गोवा विधासभेचे सभापती श्री. रमेश तवडकर यांनी यावेळी बोलताना सांगितले की, दिवाळी अंका सारख्या माध्यमातून लेखकांना व्यक्त होता येते. अशा प्रकारचे कार्य मोठ्या जोमाने पुढे नेण्याची गरज असल्याचे सांगून आश्रय फाऊंडेशनच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.
यावेळी, समाजात उत्कृष्ट योगदान दिलेल्या तसेच जे अजूनही शेती करतात अशा पंचक्रोशीतील १० शेतकऱ्यांचा सभापती श्री. रमेश तवडकर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये तिवरे गावातील श्री महाबळेश्वर गावकर,श्री गोकूळदास नाईक,कु.मंगला नाईक आणी रामदास (नानी) गावडे, वरगाव येथील श्री विठोबा देसाई आणि अरूण शेटकर, माशेल भागातून व्यंकटेश ( व्यंक्टी ) गावडे आणि मारूती गावडे, माडापै येथील मंजूळा गावडे आणि खाडोळा भागातून श्री. ऊल्हास गावकर आदींचा समावेश आहे.










