जेष्ठ साहित्यिक पुरोगामी विचारवंत अर्जून जयराम परब यांचे निधन.

👇Click and Listen

जेष्ठ साहित्यिक पुरोगामी विचारवंत अर्जून जयराम परब यांचे निधन.

मोपा (उमेश शंकर गाड)

गोमंतकीय ज्येष्ठ साहित्यिक तथा विचारवंत पुरोगामी चळवळीतील अग्रगण्य नेते विर्नोडा पेडणे येथील सुपुत्र अर्जुन जयराम परब वय ( ८८ ) यांचे अल्प आजाराने गोवा वैद्यकीय महाविद्यालयात शुक्रवारी ३ मे रोजी सकाळी निधन झाले .

दुपारी त्यांच्यावर मुळगावी विर्नोडा पेडणे येथील स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

गोमंतकातील पेडणे तालुक्यातील विर्नोडा गावात १९३६ साली जन्मलेले अर्जुन जयराम परब यांनी मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र या विषयात बीएची पदवी संपादन केली, त्यानंतर एम. ए मराठी विषयात शिवाजी विद्यापीठात त्यांनी पदवी संपादन केली. एल.एल.बी ही पदवी त्यांनी मुंबई विद्यापीठात संपादन केली. त्यानंतर वास्को येथील माता हायस्कूल , चौगुले एज्युकेशन असोसिएशन त्यांनी गेली तीस वर्ष सहाय्यक मुख्याध्यापक म्हणून काम केले . एस .एस .सी बोर्डाचे ते काही काळ सदस्य होते. निवृत्तीनंतर त्यांनी पुरोगामी चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. गोव्यातील अग्रगण्य पुरोगामी चळवळीतील एक लढाऊ म्हणून त्यांनी काम केले .

[] विपुल साहित्य संपदा आहे . यामध्ये आशेचा अंकुर (नाटक) , क्रांतिवीर भगतसिंग ( वैचारिक) लेखन ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर : एक चिंतन प्रगटन ( वैचारिक), लोककला दशावतार (संशोधनात्मक) ,श्रींची इच्छा (शिवाजीवरील लेख) , ज्ञानयोगी ज्ञानेश्वर (प्रबोधनात्मक) विचारवेध( संकीर्ण लेखसंग्रह), संत गाडगेबाबांची कीर्तने , शिवाजी त्यांचा शिवाजी आमचा ( वैचारिक ) , ज्ञानदीप लावू जगी ( वैचारिक), सनातन संस्कृतीचा पंचनामा , गरीब देशातील श्रीमंत देव , धर्मांतर ते राष्ट्रांतर , निंदकाचे घर , तुका झालासे कळस अर्थात संत श्रेष्ठ तुकारामवादी तत्त्वज्ञानाचा सार , डॉक्टर लोहिया यांचा समाजवाद विरुद्ध हिंदुत्ववाद , मराठी असे आमची मायबोली शिवाय राजकारण समाज प्रबोधन अंधश्रद्धा निर्मूलन आदी विविध विषया लोकप्रिय दैनिकातून शेकडो लेख त्यांचे प्रसिद्ध झाले आहेत.

[]विविध पुरस्कार प्राप्त

त्यांच्या लेखनाला क्रांतिवीर भगतसिंग या ग्रंथाला गोमंत विद्यानिकेतन मडगाव या संस्थेचा पुरस्कार प्राप्त झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चिंतन प्रकारचे टन या ग्रंथाला गोमंतक मराठी अकादमी तसेच महात्मा ज्योतिबा फुले आंबेडकर संस्था पुणे त्या संस्थेचा पुरस्कार प्राप्त झाला. लोककला दशावतार या संशोधनात्मक ग्रंथाला मराठी अकादमी पुरस्कार प्राप्त झाला. संपूर्ण साहित्य उपक्रम समाजसेवा या कार्याबद्दल गोमंतक मराठी अकादमी तर्फे मानत अधिसदस्यत्व बहाल करून त्यांचा गौरव केला होता. गोवा राज्य सरकारचा वाड्मयीन पुरस्कार १९९४ साली त्यांना प्राप्त झाला .लोककला दशावतार या ग्रंथाला महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट संशोधनात्मक साहित्याचा१९९३-९४ वर्षी प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त झाला. संगमनेर कवी अनंत फंदी यांच्या संत गाडगेबाबांची कीर्तन या ग्रंथाला पुरस्कार प्राप्त झाला. दलित संघटना गोवा तर्फे २००६ चा दलित मित्र पुरस्कार यांना प्राप्त झाला .अवतारी परशुराम हिंदू धर्म तारक की मारक या पुस्तकाने गोव्यात आणि महाराष्ट्रात खळबळ माजविली.

अर्जुन परब यांनी विविध विषयांचे अभ्यास करुन लेखन केले. गोव्यात पुरोगामी आणि आंधश्रध्दा निर्मुलन कार्यात त्यांचे मोठे कार्य होते. विविध संस्थांचे त्यांना पुरस्कार प्राप्त झाले . दशावतार या लोककला प्रकारावर त्यांचा अभ्यास होता. एक विचारवंत म्हणून त्यांची गोव्यात आणि महाराष्ट्रात ओळख होती . एक अभ्यासू विचारलंताला गोवा मुकाल्याची भावना त्यांच्या चाहत्यांनी व्यक्त केली. शुक्रवारी दुपारी त्यांच्यावर खालचावाडा विर्नोडा येथील स्थानिक स्मशानभूमीत त्यांच्यावार अंत्यसंस्कार करण्यात आले . यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अंत्यदर्शन घेतले.

त्यांच्या पश्चात्य पत्नी , दोन विवाहित मुलगे, सुना, नातवंडे , दोन भाऊ , भावजया , पुतणे डाॕ.प्रसाद सुर्याकांत परब , युवा उद्योजक इंसींगनीया बिल्डर कंपनीचे मालक मिलींद परब, महेश परब तसेच उद्योजक दादी परब , मधू परब यांचे ते काका होते.

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment