काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा दिला राजीनामा.
काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सॅम पित्रोदा यांचा राजीनामा स्वीकारल्याची माहिती जयराम रमेश यांनी दिली आहे. त्यांचे विधान आजच आले होते, ज्यावरून वाद झाला होता. पीएम मोदींनीही त्यांच्या वक्तव्याला वर्णद्वेषी ठरवलं होतं.
ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा त्यांच्या टिप्पणीपासून स्वतःला काँग्रेसने दूर केले, ज्यामध्ये ते म्हणाले की, दक्षिणेतील लोक “आफ्रिकन लोकांसारखे दिसतात आणि पाश्चिमात्य लोक अरबांसारखे दिसतात आणि पूर्वेकडील लोक चिनी लोकांसारखे दिसतात. सॅमचे म्हणणे खोडून काढत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश म्हणाले, सॅम पित्रोदा यांचे भारतातील विविधता वर दिलेले वक्तव्य काँग्रेसला मान्य नाही.











