राजकोटच्या TRP गेमिंग झोनमध्ये लागलेल्या भीषण आगीत 26 जण जिवंत जळाले, मृतदेहांची ओळख पटवणे कठीण

👇Click and Listen

राजकोटच्या TRP गेमिंग झोनमध्ये लागलेल्या भीषण आगीत 26 जण जिवंत जळाले, मृतदेहांची ओळख पटवणे कठीण.

गुजरातमधील राजकोटमधील कलावद रोडवरील टीआरपी गेम झोनमध्ये भीषण आग लागली आहे. या आगीत अनेकांचा मृत्यू झाला आहे. सध्या सर्व गेम झोन बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

राजकोट, गुजरातचे कलावाड, रोडवरील टीआरपी गेमिंग झोनमध्ये लागलेल्या भीषण आगीत 26 जण जिवंत जळून खाक झाले. मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. आतापर्यंत एकूण 22 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. आगीत जळालेल्या मृतदेहांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. आगीत किती लोकांचा मृत्यू झाला हे शोधण्यासाठी बचाव पथके अजूनही शोध घेत आहेत. मृतांमध्ये बहुतांश विद्यार्थी असल्याचे सांगण्यात येत आहे. आगीच्या उंच ज्वाळा काही किलोमीटर दूर दिसत होत्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment