मी सत्तेवर आलो तर पॅलेस्टाईन समर्थकांना अमेरिकेतून हाकलून देईन : डोनाल्ड ट्रम्प

👇Click and Listen

मी सत्तेवर आलो तर पॅलेस्टाईन समर्थकांना अमेरिकेतून हाकलून देईन : डोनाल्ड ट्रम्प

या महिन्याच्या सुरुवातीला, रिपब्लिकन पक्षाचे उमेदवाराने मुख्यत्वे जुह समाजाच्या देणगीदारांच्या एका लहान गटाला सांगितले की मी निवडून आल्यास पॅलेस्टाईन विद्यार्थी आंदोलकांना अमेरिकेतून हाकलून देईन.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2024 च्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवल्यास कॉलेज कॅम्पसमधील पॅलेस्टिनी समर्थक निदर्शने रोखण्याचे आश्वासन दिले आहे. अमेरिकेत 5 नोव्हेंबरला निवडणुका होणार आहेत. देशात 1912 नंतर प्रथमच विद्यमान राष्ट्रपती आणि माजी राष्ट्रपती यांच्यात लढत होणार आहे. उजव्या विचारसरणीचे नेते डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल-हमास युद्धादरम्यान इस्रायलला पाठिंबा देण्याचे उघडपणे सांगितले आहे. आता त्यांनी आपल्या देशात होत असलेल्या पॅलेस्टाईन समर्थक निदर्शने रोखण्याचे आश्वासन दिले आहे.

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment