भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या मुलाच्या ताफ्याची कारला भीषण अपघात, फॉर्च्युनर कारने 3 मुलांना चिरडले, 2 जणांचा मृत्यू

👇Click and Listen

भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या मुलाच्या ताफ्याची कारला भीषण अपघात, फॉर्च्युनर कारने 3 मुलांना चिरडले, 2 जणांचा मृत्यू

भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचा मुलगा आणि भाजप उमेदवार करण भूषण शरण सिंह यांच्या ताफ्याच्या गाडीने 3 मुलांना चिरडले असून, त्यात 2 मुलांचा मृत्यू झाला आहे.

उत्तर प्रदेशातील गोंडा येथील कर्नलगंज हुजूरपूर येथे हा अपघात झाला. वाटेत बैकुंठा डिग्री कॉलेज जवळ आहे. घटनास्थळी मोठी गर्दी जमली आहे ग्रामस्थांनी फॉर्च्युनर कार ताब्यात घेतली आहे. घटनास्थळी मोठ्या संख्येने पोलिसांचा ताफा दाखल झाला आणि मुलांचे मृतदेह ताब्यात घेतले गेला आहे.

पुढील तपास केला जात आहे. तक्रारी मध्ये करण भूषण यांचे नाव नसल्याचे समजते. तक्रारीच्या आधारे पोलिस स्टेशन कर्नलगंज येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी फॉर्च्युनर कार व चालकाला ताब्यात घेतले, आणि पुढील कारवाई करत आहे. प्रसंगि ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे. घटनेच्या ठिकाणी कायदा, सुव्यवस्थेचा सामान्य आहे.

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment