लोकसभा निवडणुकीदरम्यान, आयकर विभागाने देशभरातून 1100 कोटी रुपयांचे रक्कम व दागिने जप्त केले आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान आयकराने 1100 कोटी रुपयांचे रक्कम व दागिने जप्त केले, गेल्या निवडणुकीच्या तुलनेत 182 टक्क्यांनी झाली वाढ.
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान उद्या म्हणजेच १ जून रोजी होणार आहे. दरम्यान, 2024 च्या निवडणुकीत आयकर विभागाची चांगलीच चांदी झाल्याची बातमी येत आहे. या निवडणुकीदरम्यान विभागाने 1000 कोटींहून अधिक किमतीची रोकड आणि दागिने जप्त केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हा आकडा आणखी वाढू शकतो.

सध्याच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान, प्राप्तिकर विभागाने देशभरातील विविध ठिकाणांहून 1100 कोटी रुपयांची रोकड आणि दागिने जप्त केले आहेत. अजूनही कारवाई सुरू असल्याने हा आकडा आणखी वाढू शकतो. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 390 कोटी रुपयांची रोकड आणि दागिने जप्त करण्यात आले होते. या लोकसभा निवडणुकीत अवैध रोकड आणि दागिने जप्त करण्याच्या घटनांमध्ये १८२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
बहुतेक जप्ती ही दिल्ली आणि कर्नाटकातून ही प्रकरणे समोर आली आहेत. प्रत्येक राज्यात 200 कोटींहून अधिक रोख रक्कम आणि दागिने जप्त करण्यात आले आहेत. तर, तामिळनाडू 2 क्रमांकावर आहे, जिथे 150 कोटी रु जप्त केले आहेत. त्यानंतर आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि ओडिशामध्ये एकत्रितपणे 100 कोटी रुपये रोख रक्कम आणि दागिने जप्त करण्यात आले आहेत.











