न्हयबाग राष्ट्रीय महामार्ग 66, हा पावसाळ्यामध्ये रहदारीसाठी धोकादायक ठरू शकतो

👇Click and Listen

न्हयबाग राष्ट्रीय महामार्ग 66, हा पावसाळ्यामध्ये रहदारीसाठी धोकादायक ठरू शकतो, तरी सरकारने संबंधित डिपार्टमेंटला सक्त आदेश द्यावेत. असे नागरिकांचे म्हणणे आहे. ह्या महामार्गावरून ये-जा करणारे लोक रोज जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत, वेळेत सरकारने याची दखल घेऊन भविष्यात होणारी जीवित हानी टाळण्याकरिता संबंधित खात्याला लवकरात लवकर महामार्गाच्या दुतर्फी असणाऱ्या सुरक्षा भिंतींकडे लक्ष द्यावे, अशी सरकारकडे मागणी करत आहेत. तरी या नागरिकांच्या मागणीला मान देऊन, लवकरात लवकर या महामार्गावरील संभाव्य धोके सरकारने वेळेत ओळखून त्याची दुरुस्ती पावसाळ्याआधी करावी. जेणेकरून गोव्याची ओळख जागरूक नागरिकांचे, जागरूक सरकार अशी होण्याकरिता नागरिकांचे प्रश्न वेळेत सोडवण्यासाठी सरकारने आपली तत्परता दाखवावी हीच एक मागणी जागरूक नागरिकांची असते. विना विलंब सरकारने जागरूकतेने जनतेची कामे पूर्ण करावी हेच खरे लोकशाहीचे मूल्यांकन.

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment