झारखंड मध्ये गोव्याच्या पोलिसांची शानदार कामगिरी.
पोलीस निरीक्षक सुधीर रेडकर यांच्या नेतृत्वाखाली काही गोव्यातील पोलीस झारखंड येथे झालेल्या चौथ्या टप्प्यातील लोकसभेच्या निवडणुकीसाठी बंदोबस्तासाठी गेले होते. त्यांनी यशस्वीपणे तिथली प्रक्रिया पूर्ण केली.
पोलीस निरीक्षक सुधीर रेडकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक भैरो वरक ,सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल चीनालकर ,सहाय्यक सागर पार्सेकर, हेडकॉन्स्टेबल श्रीकृष्ण कामत, हेडकॉन्स्टेबल रत्नाकर सामंत ,हेड कॉन्स्टेबल जितेंद्र परब ,पीसी विवेक कान्नाईक, आत्माराम पालकर, मिरज रिडो आदींनी झारखंडमध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी शानदार कामगिरी बजावली .











