राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सध्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाला 5 जून रोजी निरोप देतील.

👇Click and Listen

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, सध्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाला 5 जून रोजी निरोप देतील.

17 व्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 रोजी संपत आहे. म्हणजेच 16 जून पूर्वी नवीन सरकार स्थापन होईल. प्रत्येक लोकसभेच्या कार्यकाळाच्या अखेरीस राष्ट्रपतींकडून विदाई भोजनाचे निमंत्रण दिले जाते, अशी अनेक दशकांची परंपरा आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देखील 5 जून रोजी हीच परंपरा पाळणार आहेत.

लोकसभा निवडणूक 2024, 1 जून रोजी संध्याकाळी 5 वाजता संपेल आणि 4 जानेवारीला निकाल जाहीर होतील. दुसऱ्या दिवशी म्हणजे 5 जून रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिपरिषदेला निरोप देतील. रात्री 8 वाजल्यापासून राष्ट्रपती भवनात या मेजवानीचे आयोजन करण्यात येणार आहे. 17 व्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 रोजी संपत आहे. म्हणजेच 16 जूनपूर्वी नवीन सरकार स्थापन होईल.

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment