तेरा लाखाच्या कर्जाची परतफेड एसबीआय लाइफ ने केली.

👇Click and Listen

 

एखाद्याच्या मृत्यूनंतर घेतलेले कर्ज कसे फेडावे अशा विवंचनेत असलेल्यांना जीवन विमा एक आधार ठरते आणि ते एसबीआय लाइफ ने सिद्ध करून दाखवले आहे. पिळर्ण, बार्देश येथील सहायक लाईनमन गजानन मोहन परब यांनी नवीन घर बांधण्यासाठी घेतलेल्या तेरा लाखाच्या कर्जाची परतफेड एसबीआय लाइफ ने केली. ड्युटीवर असताना परब यांना मृत्यू आला होता.

एसबीआय लाईफ कडून मिळालेल्या माहितीनुसार पिळर्ण, बार्देश येथील गजानन परब यांनी दीनदयाळ मल्टीपर्पज सोसायटीकडून घर बांधणी करता 13 लाखाचे कर्ज घेतले होते, या 13 लाखांच्या कर्जासाठी कोणीही हमीदार म्हणून राहिला नव्हता तर एसबीआय लाइफ ने गजानन परब यांच्या गैरहजेरीत ( मृत्यूनंतर ) आपण कर्जाची रक्कम भरू असे प्रतिज्ञापत्र दिले होते. त्यासाठी गजानन परब यांचा विमा उतरवण्यात आला होता. फेब्रुवारी 2023 मध्ये पंधरा वर्षाच्या मुदतीच्या विम्याचा प्रतिवर्षाचा पहिला हप्ता 14,265 रुपये त्यांनी भरला होता.

विमा घेतल्यानंतर अवघ्या दोन महिन्यातच 9 एप्रिल 2023 रोजी सहाय्यक लाईनमन म्हणून काम करणाऱ्या परब यांना काम करताना विजेचा जोरदार धक्का बसला त्यातच त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबातील एकमेव कमावते असल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला त्यातच त्यांनी घरासाठी कर्जही घेतले होते. त्यांच्या निधनाची माहिती कळताच एसबीआय लाइफचे अधिकारी त्यांच्या मदतीकरता धावून आले. त्यांनी कर्ज घेताना दिलेल्या मी प्रमाणे कर्जाच्या रकमेचा धनादेश दीनदयाळ मल्टीपर्पज सोसायटीच्या मुख्यालयातील अधिकाऱ्यांकडे सोपवला आणि परब यांच्या कुटुंबीयांची कर्जापासून मुक्तता केली.

फोटो… दीनदयाळ मल्टीपर्पज सोसायटीच्या मुख्यालयात धनादेश देताना एसबीआय लाइफ चे एक्झिक्यूटिव्ह बीएम रितेश नाईक, ज्येष्ठ विभागीय व्यवस्थापक भानुप्रकाश शर्मा, सोसायटीचे सीईओ मधुकर पाटणेकर, कर्मचारी राजेश्वरी व मुख्यालय व्यवस्थापक नरेश पेडणेकर.

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment