मोरजी पंचायत क्षेत्रातील बागवाडा व नारोजीवाडा येथील रस्ता झाला स्विमिंग पूल.

👇Click and Listen

मोरजी पंचायत क्षेत्रातील बागवाडा व नारोजीवाडा येथील रस्ता झाला स्विमिंग पूल.

येरे येरे पावसा, तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा. पावसाचे दिवस आहेत, पाऊस तर येणारच, पण सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ नये, याकरिता प्रशासन योग्य त्या पद्धतीने काळजी घेतं का हा एक मोठा सवाल आहे. असाच एक प्रकार मोरजी पंचायत क्षेत्रातील बागवाडा व नारोजीवाडा येथील रस्त्यावर घडलेला आहे. पावसाळापूर्वीची कामे ही पंचायतीकडून पूर्ण करून घेतलेली नसल्यामुळे या रस्त्यावर पाणीच पाणी साठलेले आहे. यामुळे रहदारीला अडथळे निर्माण होत आहेत. रस्त्यावरचे पाणी नागरिकांच्या घरांमध्ये घुसत आहे. लवकरात लवकर मोरजी पंचायतीने याची दखल घेऊन, नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याकरिता मोरजी पंचायतीने काम केले पाहिजे, असे मोरजी नागरिकांचे म्हणणे आहे.

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment