मोदींचा पहिला निर्णय, शेतकऱ्यांसाठी 20 हजार कोटी रुपये पीएम किसान सन्मान निधीचा 17 वा हप्ता जारी.
पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी पहिला निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा घेतला. पंतप्रधानांनी शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधीचा 17 वा हप्ता जारी केला आहे.
तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी पहिला निर्णय घेतला आहे. पंतप्रधानांनी त्यांची पहिली फाईल शेतकरी कल्याणासाठी सही केली. ‘पीएम किसान निधी’चे 20 हजार रुपये कोटी रुपयांची रक्कम जारी करण्यात आली आहे. पीएम मोदी यांच्या या निर्णयाचा फायदा 9.3 कोटी शेतकऱ्यांना होणार आहे. पंतप्रधानांनी आज पीएम किसान निधीचा शुभारंभ केला. 17 वा हप्ता जारी केला.










