कुवेत अग्निकांड मध्ये 40 भारतीयांचा मृत्यू, पाच मृतदेहांची ओळख पटली.

👇Click and Listen

कुवेत अग्निकांड मध्ये 40 भारतीयांचा मृत्यू, पाच मृतदेहांची ओळख पटली.

कुवेत मध्ये लागलेल्या आगीत 49 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 40 भारतीयांचा समावेश आहे. बहुतांश लोक हे केरळ आणि तामिळनाडूतील असल्याचे सांगितले जाते. कुवेतमधील आगीच्या घटनेशी संबंधित परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी बैठक घेतली.

कुवेतमध्ये बुधवारी सकाळी एका इमारतीला लागलेल्या आगीत 49 जणांचा मृत्यू झाला तर 30 जण जखमी झाले. मृतांमध्ये 40 भारतीयांचा समावेश आहे. आतापर्यंत या घटनेत प्राण गमावलेल्या लोकांमध्ये केरळमधील नागरिकांची ओळख पटली आहे. बऱ्याच मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. आगीत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये केरळ आणि तामिळनाडूमधील लोकांची संख्या जास्त आहेत. या अपघाताचे वृत्त कळताच दोन्ही राज्यातील कुटुंबात शोककळा पसरली आहे. कुवेतमधील आगीच्या घटनेशी संबंधित परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी बैठक घेतली.

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment