पेडणे पालिकेच्या इमारतीचं निकृष्ट दर्जाचे काम, या कामाची नगर नियोजन मंत्री आणि पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी पाहणी करण्याची प्रकाश कांबळी याची मागणी
पेडणे (प्रतिनिधी )
पेडणे पालिकेच्या इमारतीचं काम निकृष्ट दर्जाचे झाले असून या कामाची नगर नियोजन मंत्री आणि पेडण्याचे आमदार प्रवीण अर्लेकर यांनी पाहणी करून कंत्राटदार तसेच सुडाला सक्त आदेश द्यावे अशी मागणी पेडणे येथील समाजकार्य करते प्रकाश कांबळे यांनी केली आहे.
प्रकाश कांबळे म्हणाले की सुमारे साडेसात कोटी खर्च करून जी सुडा तर्फे पेडणे पालिकेची इमारत उभारण्याचं काम सध्या सुरू आहे. गेली दोन वर्ष हे काम सुरू आहे मात्र अत्यंत मंद गतीने हे काम सुरू असल्याने असून कामाच्या दर्जाबाबतही प्रश्न उपस्थित होत आहे. ही इमारत योग्य प्रकारचा आराखडा तयार न करता बॉक्स पद्धतीने उभारण्यात येत आहे त्यामुळे या कामाबद्दल संशय व्यक्त होत असून पेडणे पालिका मंडळाने याबाबत लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रकाश कांबळे यांनी सांगितले .
पेडणे पालिका इमारतीचं काम सुरू करण्यात आलं मात्र हे काम अत्यंत संत गतीने आणि निष्कृष्ट दर्जाचं झाल्याचं वेळोवेळी समाज माध्यमातून तसेच वर्तमानपत्रातून त्याबाबत बातम्या आल्या. त्यानंतर पेडणे मतदारसंघ आमदार आणि पालिका मंडळाने या कामाची अधिकाऱ्यांना घेऊन पाहणी केली मात्र काही काही काळासाठी हे काम त्यांनी सुरळीत ठेवले . मात्र त्यानंतर हे काम मंद गतीने केल्याने या कामाबाबत पालिका मंडळ मुग घेऊन गप्प असल्याने प्रकाश कांबळे यांनी नाराजी व्यक्त करा नगर नियोजन मंत्री विश्वजीत राणे तसेच पेड ण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी या कामाची पाहणी करून कंत्राटदार तसेच संबंधित अधिकारांना सत्ता आदेश द्यावे अशी मागणी पत्रकार परिषदेत केली आहे.










