चकमकीत ठार झालेल्या आठ नक्षलवाद्यां पैकी सहा जणांवर होते, 48 लाखांचे बक्षीस.

👇Click and Listen

छत्तीसगडमधील नारायणपूर येथे चकमकीत ठार झालेल्या आठ नक्षलवाद्यां पैकी सहा जणांवर होते, 48 लाखांचे बक्षीस.

छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये दोन दिवसांपूर्वी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी आठ नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. यामध्ये चार महिलांचाही समावेश आहे. घटनास्थळावरून सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त केला आहे. सहा नक्षलवाद्यांवर एकूण 48 लाख रुपयांचे बक्षीस होते. दोघांची ओळख अद्याप पटलेली नाही. या वर्षात आतापर्यंत एकट्या बस्तर विभागात 131 नक्षलवाद्यांना पाठवले यमसदनी.

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment