इटलीच्या दक्षिण किनाऱ्यावर 2 जहाजांना जलसमाधी, 13 जणांचा मृत्यू, 61 बेपत्ता.
इटलीच्या दक्षिण किनाऱ्याजवळ एक भीषण अपघात झाला आहे. येथे 2 जहाजे बुडाल्याने 13 जणांचा मृत्यू झाला असून 61 लोक बेपत्ता आहेत. बेपत्ता झालेल्यांमध्ये 26 मुलांचाही समावेश आहे.
रोम : इटलीच्या दक्षिण किनाऱ्यावर दोन जहाजे बुडाल्याने 61 जण समुद्रात बेपत्ता झाले, तर या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला. संयुक्त राष्ट्रांच्या एजन्सींनी एका निवेदनात हगडासेबद्दल माहिती दिली आहे. दुसऱ्या अपघाताबाबत, जर्मन मदत गट ‘रेकशिप’ने ‘X’ वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, पहिल्या जहाज दुर्घटनेत बचाव कर्मचाऱ्यांना इटलीतील लॅम्पेडुसा या छोट्या बेटाजवळ 10 स्थलांतरितांचे मृतदेह सापडले आहेत.











