आता फेक कॉल आणि मेसेज होणार बंद, मोदी सरकारचा मोठा निर्णय.
भारतात झपाट्याने वाढत असलेले फेक कॉल्स आणि मेसेज रोखण्यासाठी मोदी सरकारने आणखी एक कठोर निर्णय घेतला आहे. सरकारने यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत आणि 21 जुलैपर्यंत लोकांच्या प्रतिक्रिया मागवल्या आहेत.
लोकांच्या अभिप्रायानंतर, हे विधेयक सादर केले जाईल आणि त्याची अंमलबजावणी केली जाईल. गेल्या काही वर्षांत बनावट कॉल आणि मेसेजच्या माध्यमातून फसवणुकीची प्रकरणे समोर आली आहेत. सरकारचे हे पाऊल सर्वसामान्यांना दिलासा देणारे ठरणार आहे.
सरकारने आपली मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत आणि 21 जुलैपर्यंत सार्वजनिक टिप्पणीसाठी ती उपलब्ध करून दिली आहेत. याआधीही, ट्राय आणि दूरसंचार विभागाने बनावट कॉल्सला आळा घालण्यासाठी बँकिंग आणि नोंदणीकृत वित्तीय संस्थांसाठी नवीन 160 क्रमांकाची मालिका जारी केली आहे, जेणेकरून लोकांना वास्तविक आणि बनावट कॉल ओळखण्यात कोणतीही अडचण येऊ नये. तसेच, दूरसंचार विभाग दोन दूरसंचार मंडळांमध्ये कॉलर आयडी नेम रिप्रेझेंटेशन (CNAP) ची चाचणी करत आहे.











