उर्जा फाऊंडेशनचे सात तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रम.
उर्जा फाऊंडेशन ने दहावीच्या राज्यातील सात तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी विविध ठिकाणी खालीलप्रमाणे शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रम आयोजित केलेले आहेत.
रविवार, दिनांक २३ जून रोजी सकाळी ९.३० वाजता सत्तरी तालुका – के. बी. हेडगेवार हायस्कूल, वाळपई सायंकाळी ३.३० वाजता
डिचोली तालुका – केशव सेवा साधना हायस्कूल, डिचोली शनिवार दिनांक २९.०६.२०२४ रोजी
फोंडा तालुका – जि.व्ही.एम्. हायरसेकंडरी स्कूल, फर्मागुडी, फोंडा
रविवार, दिनांक ३०.०६.२०२४ रोजी सकाळी ९.३० वाजता सांगे तालुका – गव्हर्मेंट हायर सेकंडरी स्कूल, सांगे सायंकाळी ३.३० वाजता
काणकोण तालुका – मल्लिकार्जून हायस्कूल, काणकोण शनिवार, दिनांक ०६.०७.२०२४ रोजी सायंकाळी ३.३० वाजता
बारदेश तालुका – जनता हायस्कूल, म्हापसा रविवार, दिनांक ०७.०७.२०२४ रोजी सकाळी ९.३० वाजता
पेडणे तालुका – संत सोहिरोबानाथ आंबिये कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्स उर्जा फाऊंडेशन चे दहावीमध्ये शिकत असणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती प्रदान करण्याचे हे अकरावे वर्ष आहे. गेल्या वर्षी ४०६ विद्यार्थ्यांना प्रत्येकी रूपये तीन हजार शिष्यवृत्ती देण्यात आली होती. सुरवातीची काही वर्षे पेडणे, सत्तरी आणि डिचोली तालुक्यापुरता मर्यादित असलेला हा उपक्रम गेल्या दोन वर्षांपासून बारदेशा तालुक्यात राबविण्यात आला तर गेल्या वर्षापासून सांगे आणि काणकोण तालुक्यांचा समावेश करण्यात आला. यंदा प्रथमच फोंडा तालुक्यातील सर्व हायस्कूलचा उपक्रमात समावेश करण्यात आला आहे. यंदा एकुण ५०५ विद्यार्थ्यांना प्रत्येकी रू. ३०००/- प्रमाणे शिष्यवृत्ती मान्यवर दात्यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल. विद्यार्थ्यांची निवड प्रत्येक हायस्कूल करते. तर शिष्यवृत्तीची रक्कम मान्यवर दात्यांच्या मदतीने उभी केली जाते.
यंदाच्या या कार्यक्रमांना शिष्यवृत्तीसाठी निवड झालेले त्या त्या तालुक्यातील विद्यार्थी, शिक्षक आणि पालक तसेच मान्यवर दाते यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन उर्जा फाऊंडेशनचे संस्थापक दुर्गादास परब यांनी केलेले आहे.











