धारगळ म्हाखाजान राष्ट्रीय महामार्गावरील संरक्षण भिंतीवरती दरड कोसळण्याने संरक्षण भिंतीला पडले तडे.

👇Click and Listen

धारगळ म्हाखाजान राष्ट्रीय महामार्गावरील संरक्षण भिंतीवरती दरड कोसळण्याने संरक्षण भिंतीला पडले तडे.

धारगळ म्हाखाजान राष्ट्रीय महामार्गावरील संरक्षण भिंतीवरती दरड कोसळली भिंतीला गेले तडे. ही पण भिंत कोसळण्याच्या मार्गावरती आहे सरकारने याकडे तातडीने लक्ष द्यावे अन्यथा, आज मालपे पेडणे, रस्त्याची संरक्षण भित कोसळली ही ताजी घटना आपल्यासमोर आहेच, व चार लोकांचा जीव जाता जाता वाचलेला. तरी या गोष्टीच्या गांभीर्याकडे लक्ष देऊन सरकारने धारगळ म्हाखाजान राष्ट्रीय मार्गावरील संरक्षण भिंतीकडे त्वरित आणि तातडीने त्याच्यावर, उपाययोजना कराव्यात. जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये कोणत्याही प्रकारची वाईट घटना घडू नये. याकडे सरकारने लगेचच लक्ष द्यावे.

हायवेच्या कामाचे टेंडर, ज्या कंपनीला तुम्ही दिलेल्या आहे. त्या कंपनीची जबाबदारी देखील, या घटनांमध्ये तितकीच महत्त्वाची आहे. येणाऱ्या काळामध्ये काही बरं वाईट झाल्यास, या कंपनीला जबाबदार धरावे व त्यावर कठोर कारवाई करावी, अशी नागरिकांच्याकडून मागणी होत आहे. आणि त्याची सुरुवात ही, आजच्या मालपे पेडणे येथे घडलेल्या घटनेचे जबाबदार धरून त्यांच्यावरती, कडक कारवाई करावी, असे नागरिकांचे म्हणणे आहे, व मागणी आहे.

 

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment