देवस्थानाने आपल्या निधीतून १० टक्के रक्कम सामाजिक कार्याला द्यावी : सरपंच प्रशांत नाईक

👇Click and Listen

देवस्थानाने आपल्या निधीतून १० टक्के रक्कम सामाजिक कार्याला द्यावी : सरपंच प्रशांत नाईक

प्रत्येक प्रभागात देवस्थान आहे आणि त्या देवस्थानाला दरवर्षी विविध माध्यमातून निधी प्राप्त होतो. यातील मंदिराच्या एकूण निधीपैकी किमान १० टक्के निधी हा त्यांनी गरजू विद्यार्थ्यांसाठी वापरला पाहिजे किंवा सामाजिक कार्यासाठी वापरावे असे आवाहन मांद्रे सरपंच प्रशांत उर्फ बाळा नाईक यांनी केले आहे.

श्री देव सप्तेश्वर भगवती प्रमुख पंचायतन देवस्थान देऊळवाडा मांद्रे यांच्यातर्फे मांद्रे गावातील १० शाळांमधील ५० गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत वाटपाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच नाईक बोलत होते. यावेळी मांद्रे उपसरपंच तारा हडफडकर, पंच सदस्य राजेश मांद्रेकर, देवस्थान अध्यक्ष आणि सचिव उपस्थित होते.

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment