6 मजली इमारत कोसळून, 7 जणांचा मृत्यू, सुरत मध्ये घडली भयानक घटना.

👇Click and Listen

6 मजली इमारत कोसळून, 7 जणांचा मृत्यू, सुरत मध्ये घडली भयानक घटना.

गुजरातमधील सूरतमध्ये सततच्या पावसामुळे, मध्यभागी असलेले 6 मजली घर कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. सुरतमधील सचिन पाली भागात 6 मजली इमारत कोसळली. ती जीर्ण इमारत होती. इमारत कोसळल्याने 7 जणांचा मृत्यू झाला. अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही इमारत स्लम बोर्डाची असल्याचे सांगितले जाते. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे.

सुरतचे मुख्य अग्निशमन अधिकारी म्हणाले, ‘रात्रभर शोध मोहीम सुरू होती. आता पर्यंत सात मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची भीती याआधी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती. अचानक कोसळलेल्या इमारतीत काही लोक भाडेकरू म्हणून राहत होते. ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तेथे केवळ 5 ते 6 कुटुंबे राहत असल्याची माहिती मिळाली आहे. इमारतीचा मालक परदेशात राहत असल्याचीही माहिती मिळाली आहे. प्रशासन जेसीबी मशिन व कटर मशिनच्या साह्याने ढिगारा हटवत आहे. त्यातही बराच वेळ लागू शकतो. त्यानंतरच कळेल की आत किती लोक गाडले गेले आहेत

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment