कडशी नदीला पूर, नदीवरील दोन्ही पुल पाण्या खाली.
आज सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान सुरु झालेल्या जोरदार पावसा मुळे कडशी नदीला पूर आला व या नदीवरील दोन्ही पुल पाण्या खाली गेले
रात्री चा पाउस रोजच असतो त्या मुळे एवढे पाणी येईल याची कल्पना नसल्याने शेत कामासाठी जाणारे लोक अलीकडे पलीकडे गेले व जोरदार पाऊस सुरु झाला व दोन तासात पाणी वाढले तसेच मोपा विमान तळावर जाणाऱ्या गाड्या घेउन जे पहाटे च जातात ते पाच दरम्यान नीघाले होते अशी अनेक माणसे अडकून पडली तरी आज रवीवार असल्याने शालेय विद्यार्थी मात्र घरीच राहीले नाही तर त्यांचीही मोठी अडचण झाली असती
कडशी मोपा वाड्याची ही पावसाळ्यात होणारी व्यथा गेल्या वर्षी या भागाचे आमदार प्रवीण आर्लेकर यानी स्वतः येउन पाहीली होती ते गेल्या पावसाळ्यात अनेकदा या भागात येउन गेले होते व लोकांची विचारपुस केली होती काय कमीजास्त असेल किवा गरजेच्या वस्तू पोहचवण्याची तयारीही केली होती तसेच सरकारी अधीकार्यानाही घेऊन अनेकदा पहाणी ही केली होती व तसेच विधानसभा अधिवेशनात त्यानी हा प्रश्न मांडला त्याच प्रमाणे त्यानी प्रयत्न ही केले होते मध्ये निवडणूक आल्याने आचारसंहिता लागल्याने हे काम अडकले
आद दुपारी आठ वाजल्या पासुन नदीचे पाणी वाढत होते ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत वाढत राहिले संध्याकाळी चार च्या नंतर पावसाने थोडी विश्रांती घेतली त्यामुळे काशीचे पाणी संध्याकाळी सात वाजल्या नंतर कमी व्हायला लागले उदा सरकारने शाळेला सुट्टी दिल्याने विद्यार्थ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे.










