मोरजी पंचायत क्षेत्रातील रस्त्यावर साचले पाणी.
मोरजी पंचायत क्षेत्रातील रस्त्यावर जे पाणी साचलं जातं, त्या ठिकाणी गटार व्यवस्था उभारण्यास सार्वजनिक बांधकाम खात्याने परवानगी द्यावी. पंचायत मंडळाचे ठराव संबंधित खात्याकडे
पेडणे (प्रतिनीधी )
नेहमीच येतो पावसाळा आणि पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पूर्ण गावागावात गटार व्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे चित्र दिसून येते. त्याच पद्धतीने मोरजी पंचायत क्षेत्रातील ही स्थिती तशीच असून विद्यमान सरपंच मुकेश गडेकर यांच्या नेतृत्वाखाली पंचायत मंडळांनी मोर जी पंचायत क्षेत्रातील नारोजी वाडा ते बागवाडा विद्याप्रसारक हायस्कूल परिसर ते जंक्शन परिसर ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी रस्त्यावर साचले जाते. ते पावसाचे पाणी आणि त्याचा निचरा करण्यासाठी रस्त्याच्या बाजूला गटार व्यवस्था बांधण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खाते रस्ता विभागाने परवानगी दिली, तर आम्ही पंचायत निधीमधून गटार व्यवस्था उभारू त्यासाठी तशा प्रकारचे ठराव गट विकास अधिकारी पेडणे यांना पाठवले आणि पेडणे गट विकास अधिकारी कार्यालयातून जोपर्यंत सार्वजनिक बांधकाम खात्याकडून गटार उभारण्यासाठी परवानगी मिळत नाही .तोपर्यंत ही गटार व्यवस्था उभारणे कठीण असल्याचे कळवल्याने मोर जी पचायतीने तातडीने
सार्वजनिक बांधकाम खात्याला निवेदन देऊन संबंधित ठिकाणी गटार व्यवस्था करण्यास बांधकाम खाते रस्ता विभागाने आम्हाला परवानगी द्यावी. अशी विनंती करणारे निवेदना सादर केली. असल्याची माहिती मोर जी सरपंच मुकेश गडेकर यांनी दिली.
मोरजी पंचायत क्षेत्रातील सफेरा हॉटेल नारोजी वाडा सी हॉर्स जंक्शन बागवाडा कांचोळे वाडा जंक्शन ते विद्या प्रसारक जंक्शन अशा ठिकाणी रस्त्याच्या बाजूला गटार व्यवस्था उभारण्याची तयारी मोरर्जी पंचायत मंडळांनी ठेवली असून पांचिक बैठकीत तशा प्रकारचा ठराव गट विकास अधिकाऱ्यांना पाठवलेला आहे. गट विकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून पंचायतीने या गटार व्यवस्थेवर निधी खर्च करण्यापूर्वी अगोदर जी जागा सार्वजनिक बांधकाम खाते रस्ता विभागाची असल्यामुळे त्यांचा ना हरकत दाखला मिळवून पुढील काम सुरू करावे. असे पत्र मोरर्जी पंचायतीला दिले आहे. त्यानुसार मोरर्जी पंचायतीने सार्वजनिक बांधकाम खाते रस्ता विभागाला गटार व्यवस्था उभारण्याची परवानगी मागलेली आहे.
भविष्यात खिंड मोरजी ते न्यूववाडा मोरजी पर्यंत रस्त्याचे रुंदीकरण होणार आहे. त्यामुळे जी जागा सार्वजनिक बांधकाम खात्याची संपादित केलेली आहे. ती जागा कुठपर्यंत आहे? त्याचं डीमार्केशन सार्वजनिक बांधकाम खात्याने मोर जी पंचायतीला द्यावे. त्यानंतर मोरर्जी पंचायत स्वतः ही गटार व्यवस्था उभारतील अशी माहिती मोरजी सरपंच मुकेश गडेकर यांनी दिली.
मोरजी पंचायत क्षेत्रातील गटार व्यवस्था पूर्ण पणे कोलमडून गेलेली आहे. याला जबाबदार केवळ सरकार आणि मोर जी पंचायत ठरू शकत नाही. रस्त्याच्या बाजूला असलेली मोठी बांधकामे रस्त्याला टेकूनच उभारली जातात. त्यामुळे बांधकाम करताना बांधकाम साहित्य किंवा रस्त्याच्या बाजूला जमिनीत अतिक्रमण करून गटार व्यवस्था पूर्ण पणे नष्ट केली जाते.
बांधकामाना कुणाचा विरोध नाही. मात्र ज्यांनी रस्त्याच्या बाजूला बांधकामे, आस्थापने ,दुकाने, घरे उभारलेली आहे. त्यांनी अगोदर रस्त्याच्या रुंदीकरणाचा विचार करत आणि आपापले ग्राहक किंवा आपले नागरिक आपले सगे सोयरे आपल्या निवासस्थानी आपल्या दुकानात आपल्या आस्थापना येतील त्यांच्यासाठी वाहने पार्किंग सोय करणे आवश्यक आहे. परंतु तसे कोणी करत नसल्याचे चित्र दिसून येते. मोरजी पंचायत क्षेत्रातील मुख्य रस्ता हा 25 मीटर रुंदीचा रस्ता आरक्षित केलेला असतो 25 रुंदीचा रस्ता म्हणजे पूर्णपणे 25 मीटर हॉट मिक्स डांबरीकरण नसते त्यामुळे ज्या रस्त्याच्या बाजूला जे कोणी नवीन बांधकामे करत असतात त्यांनी रस्त्याच्या मधो मधून साडेबारा मीटर जागा सोडून बांधकामे करण्यास हरकत नाही. ही जमीन सार्वजनिक बांधकाम खात्याची नसली तरी ती वाहने पार्किंग किंवा इतर सोयी सुविधा पुरवण्यास जागा आरक्षित करणे आवश्यक आहे. त्या नजरेतून रस्त्याच्या बाजूला बांधकाम करत असताना साडेबारा मीटर अंतर सोडून बांधकामे करण्यास कुणाची हरकत नाही.
सध्या मोरजी पंचायत क्षेत्रात जर एक नजर मारली तर नारोजी वाडा ते बागवाडा कांचोळे वाडा विद्या प्रसारक हायस्कूल जंक्शन कट्टेवाडा शाळा विठ्ठलदास बागवाडा या परिसरात ठिकठिकाणी रस्त्यावर पाणीच पाणी दिसून येते. या रस्त्यावरून वाहने चालवताना बरीच कसरत करावी लागते. त्या नजरेतून मोरर्जी पंचायतीचे सरपंच मुकेश गडेकर यांनी पुढाकार घेऊन या रस्त्याच्या बाजूला गटार व्यवस्था उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने जर वेळीच ना हरकत दाखला जमिनीचा दिला तर या रस्त्यावर गटार व्यवस्था उभारण्यास पंचायत मंडळ आपल्या निधीचा वापर करू शकतात.










