पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू, NDA आणि INDIA काटे की टक्कर.

👇Click and Listen

पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू, NDA आणि INDIA काटे की टक्कर.

13 विधानसभा जागा: सात राज्यांमधील 13 विधानसभा जागांवर आज पोटनिवडणूक होत आहे. बिहारमधील 1, मध्य प्रदेशातील 1, उत्तराखंडमधील 2, पंजाबमधील 1, बंगालमधील 4, तामिळनाडूमधील 1 जागेसह हिमाचल प्रदेशातील 3 जागांसाठी मतदान होत आहे.

बिहारची रुपौली, मध्य प्रदेशातील अमरवाडा, उत्तराखंड बद्रीनाथ आणि मंगलोर, पंजाबचे जालंधर पश्चिम, बंगाल रायगंज, राणाघाट दक्षिण, बागडा, माणिकतला, तामिळनाडू विक्रवंडी सीट तसेच हिमाचल प्रदेशातील देहरा, हमीरपूर आणि नालागढ जागेवर आज मतदान होत आहे. या जागांवर 14 जून रोजी पोटनिवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात आली होती. नामांकनाची अंतिम तारीख 21 जून होती. 24 जून रोजी छाननी पूर्ण झाले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 26 जून आहे होते. या निवडणुकीचा निकाल 13 जुलैला लागणार आहे.

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment