व्यापार, वाहतुकीपासून ते तंत्रज्ञानापर्यंत, 9 करारांवर स्वाक्षऱ्या.
मॉस्को : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात झालेल्या भेटीत भारत आणि रशियामध्ये 9 महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. यामध्ये मुक्त व्यापारापासून ते रुपयात व्यवसाय करण्यापर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीत आर्थिक अजेंडा हा मुख्य फोकस असल्याचे म्हटले होते. संरक्षण आणि सुरक्षा हा देखील चर्चेचा महत्त्वाचा मुद्दा होता. कनेक्टिव्हिटी कॉरिडॉरवरही चर्चा झाली, चेन्नई-व्लादिवोस्त्स्क कॉरिडॉरवरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.










