आपचे आमदार, आणि माजी मंत्री राजकुमार आनंद यांच्यासह अनेक नेते भाजपमध्ये दाखल.

👇Click and Listen

आपचे आमदार, आणि माजी मंत्री राजकुमार आनंद यांच्यासह अनेक नेते भाजपमध्ये दाखल.

आम आदमी पक्षाचे माजी नेते आणि मंत्री राजकुमार आनंद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन बसपमध्ये प्रवेश केला होता.

आम आदमी पक्षाचे (आप) माजी नेते आणि मंत्री राजकुमार आनंद यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. राजीनामा देऊन बसपामध्ये प्रवेश केला होते. आता त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहेत. त्यांच्यासोबत आपचे विद्यमान आमदार कर्तार सिंग तंवर, रत्नेश गुप्ता, सचिन राय, माजी आमदार वीणा आनंद आणि आप कौन्सिलर उमेद सिंग फोगट यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

अलीकडेच एप्रिलमध्ये राजकुमार आनंद यांनी पक्षाच्या भ्रष्टाचाराबाबतच्या धोरणावर नाराजी व्यक्त करत मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्याचा थेट संबंध मद्य धोरण प्रकरणाशी होता, ज्यामध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली होती.

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment