मांद्रे, देऊळवाडा रस्त्यांचा देव कोण?

👇Click and Listen

मांद्रे, देऊळवाडा रस्त्यांचा देव कोण?

देऊळवाडा मांद्रे येथील मुख्य रस्त्यावर विज वाहिन्या टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आली होती. नंतर त्या ठिकाणी पडलेल्या खड्डा न बुजवल्याने आता पावसाचे पाणी साचून ये-जा करणार्या वाहन चालक त्या खड्ड्यात पडण्याचे प्रकार सुरू. या ठिकाणी काल ६ वीत शिकणारी शाळकरी एक मुलगी व वडील सकाळी पडून दुखापत झाली. या विषयी संबंधित खातेला स्थानिक पंचायत विनंती केली की सदर खोदकाम करण्यात आल्यानंतर खड्डा बुजवला नाही ते बुजवावे मात्र पेडणे pwd खात्याचे अधिकारी आम्हाला हे पडत नाही. स्थानिक पंचायतीने करावे असे सांगितल्याने स्थानिक पंच व सरपंच संताप व्यक्त करत संबंधित खाते वर टीका करत सरपंच प्रशांत नाईक यांनी pwd अधिकारी लक्ष देत नसून मांद्रे गावात विविध ठिकाणी अशा प्रकारच्या खोदकाम केल्याने अनेक जण खड्डा्यात पडून जखमी व दुखापत झाल्याचे सांगितले. पूढे बोलताना सरपंच म्हणाले की ” गावात अनेक ठिकाणी खड्डे हे संबंधित खात्याना दिसत नाही हे खाती एक प्रकारचे घोटाळा करीत आहे आणि लोकांच्या जीवाशी खेळत आहेत. स्थानिक आमदारने सांगून सुध्दा हे अधिकारी लक्ष देत नाही. असेच राहिले तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार. या संबंधित अधिकार्याला संपर्क साधला पण ते काही उत्तर दिले नाही.

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment