“बाप तर दाखवा, नाहीतर श्राद्ध तर घाला”. तूये नागरिक समिती, तुये हॉस्पिटल बाबत आक्रमक.
तुये हॉस्पिटल लवकरात लवकर चालू करण्याबाबत तुये नागरिक समिती यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, सरकारला जाब विचारलेला आहे. तुये हॉस्पिटल लवकर चालू करा अन्यथा आम्ही सरकार विरुद्ध आंदोलन उभा करू. गेले कित्येक वर्ष बांधून तयार असलेले तुये हॉस्पिटल हे आतापर्यंत का? चालू होत नाही, या पाठीमागची कारणे काय? हे जनतेला समजावून सांगा. तुये हॉस्पिटल सुरू न करणे यामध्ये नक्की गौडबंगाल काय आहे? याचे उत्तर सरकारने त्वरित द्यावे. आणि तुये हॉस्पिटल लवकरात लवकर चालू करावे अशी मागणी तुये नागरिक समितीच्या माध्यमातून सरकारला करण्यात आली.
तुये नागरिक समितीतर्फे आमंत्रित केलेल्या बैठकीत सरकारने तुये येथील आरोग्य केंद्राचे काम सुरू न केल्यास आंदोलन उभारणार असल्याचा मांद्रे सरपंच प्रशांत उर्फ बाळा नाईक यांचा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना इशारा.
तूये नागरिक समितीने आयोजित केलेल्या चळवळीत माजी मुख्यमंत्री प्र.लक्ष्मीकांत पार्सेकर आप नेते अमित पालेकर, देवेंद्र प्रभुदेसाई, काँग्रेस नेते नारायण रेडकर, प्रसाद शहापूरकर , मांद्रे माजी सरपंच ॲड.अमित सावंत, वाल्मिकी नाईक, ॲड.जितेंद्र गावकर , बाबी बागकर, र्निलेश कांडोलकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.










