गटारींची व्यवस्था की, गटारीत व्यवस्था? मांद्रे पंचायत क्षेत्रातील हाल.

👇Click and Listen

गटारींची व्यवस्था की, गटारीत व्यवस्था? मांद्रे पंचायत क्षेत्रातील हाल.

पेडणे (प्रतिनीधी )

मांद्रे पंचायत क्षेत्रातील अनेक ठिकाणचे रस्ते खड्डेमय चिखलमय बनल्याबरोबरच गटार व्यवस्थाचे तीन तेरा वाजलेले आहे. मांद्रे पंचायतीने पुढाकार घेऊन पंचायत निधीमधून गटारे उपसण्याचा उपक्रम यशस्वीपणे राबवला. गटारे उपस्त असताना गटारातील माती चिखल गटाराच्या बाजूलाच ठेवली. ती माती इतरत्र हलवली नसल्यामुळे पावसाळ्यात सगळी माती या गटारात पुन्हा पडून गटारे तुडुंब मातीने चिखलाने भरलेले आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्याचे पाणी गटारात न जाता थेट रस्त्यावरून वाहत आहे. याकडे आता पंचायतीने लक्ष देऊन योग्य पद्धतीने गटार उपसावेत अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

नेहमीच येतो पावसाळा त्याप्रमाणे प्रत्येक दरवर्षी पावसाळ्यात गटार व्यवस्था कोलमडलेली स्थिती सगळीकडे दिसून येते. प्रत्येक पंचायत आपल्या पंचायत निधीमधून आपापल्या प्रभागातील गटार व्यवस्था उपसण्याचं काम हाती घेतात. आणि गटारे उपसली जातात. गटारे उपसल्या नंतर त्यातील माती दगड धोंडे हे त्याच ठिकाणी ठेवले जातील. इतरत्र हलवण्याची सौजन न दाखवल्याने पावसाच्या प्रवाहातून ही माती पुन्हा गटारात गेली. आणि पूर्णपणे गटार व्यवस्था कोलमडून गेल्याचे चे चित्र दिसून येते.

ज्या पद्धतीने मांद्रे पंचायत क्षेत्रातील गटार व्यवस्था कोलमडलेली आहे. त्याच पद्धतीने या पंचायत क्षेत्रातील मुख्य रस्ते खड्डेमय बनले आहे. रस्त्याची डागडूजी करत असताना सार्वजनिक बांधकाम खाते दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसते. ज्यावेळी ग्रामस्थ या रस्त्याविषयी आवाज करतो. किंवा पंचायत मंडळाचा एखादा प्रतिनिधी आवाज करतो. त्यावेळी डोळ्याला पाने l पुसण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खाते रस्ता विभाग ज्या रस्त्याच्या मधोमध खड्डे पडले ,त्या खड्ड्यांमध्ये दगड घालून माती घालून बुजवण्याचा प्रयत्न करतात. पुन्हा मोठा पाऊस आला आणि जोरदार वाहने गतीने गेली की सुरुवातीला छोटे पडलेले खड्डे ,कालांतराने मोठे होतात. आणि सर्वच रस्ता खड्डामय होतो. अशी स्थिती दिसून येते.

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment