मांद्रे माजी सरपंच तथा विद्यमान पंच अँड.अमित सावंत यांना अटक व सुटका.
पेडणे (प्रतिनीधी )
मांद्रे चे माजी सरपंच तथा विद्यमान पंच अँड. अमित सावंत यांच्या विरोधात सार्वजनिक बांधकाम खाते रस्ता विभाग पेडणे अभियंताने रस्ता खणल्या प्रकरणी त्यांच्या विरोधात मांद्रे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती. या तक्रारीची तातडीने दखल घेऊन जामीन पात्र गुन्हा नोंदवून तातडीने मांद्रे पोलिसांनी एडवोकेट अमित सावंत यांना अटक केली. आणि लगेच सुटका केली.
सविस्तर माहिती नुसार मांद्रे पंचायत क्षेत्रात सध्या मोठ्या प्रमाणात गटार व्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले आहेत. मान्सूनपूर्व कामे अधिकाऱ्यांनी वेळेवर मान्सून पूर्व कामे न केल्यामुळे पावसाळ्यात गटार व्यवस्था कोलमडून गेली. त्याचाच एक भाग म्हणून सावंत वाडा मांद्रे येथील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गटार तुंबले होते. आणि एक गटार रस्त्याच्या मधोमध पलीकडे जात असताना ते तुडुंब भरल्याने ते उपसण्यासाठी काही प्रमाणात रस्त्याचं खोदकाम केलं .आणि पाण्याला वाट मोकळी करून दिली. पाणी सर्वत्र निघालं. परंतु याचे गंभीर दखल घेत पेडणे सार्वजनिक बांधकाम खाते रस्ता विभागांच्या अभियंत्यांनी तातडीने रस्ता कोणताही परवाना नसताना खणल्या प्रकरणी अँड. अमित सावंत यांच्या विरोधात तक्रार नोंदवली. आणि मांद्रे पोलिसांनी तातडीने त्यांना अटक केली व लगेच सुटका केली .
माझ्यावर तक्रार का झाली?. ॲड. अमित सावंत यांची माहिती.
एडवोकेट अमित सावंत यांनी माहिती देताना सांगितले की आपल्याला या संदर्भात अटक केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर सर्वत्र नातेवाईक मित्रमंडळी कडून फोन येत होते. सामाजिक कार्यकर्ते चळवळीतील लोकही मला फोन करून माझी विचारणा करत होते. कुणाच्या मनात गैरसमज नको, म्हणून आपण खुलासा करत आहे .मागच्या कित्येक दिवसापासून पाऊस पडत आहे. आणि जे पारंपारिक नाला आहेत ,ते नाले तुडुंब भरल्यानंतर पावसाचे पाणी जात नव्हते. त्यामुळे सर्वत्र पाणी रस्त्यावर साचून त्याचा नागरिकांना त्रास होत होता .म्हणून जो रस्त्यावर गटार व्यवस्था आहे आणि जो नाला होता तो नाला साफ करण्यासाठी थोड्या प्रमाणात रस्ता खण्याची पाळी आली. आणि त्यानंतर सगळे पाणी सुरळीत निघून गेले. नाला हे सर्वत्र ब्लॉक करण्यात आले होते. परंतु पंचायत मंडळ आपल्या मार्फत गटार व्यवस्था साफसफाई करत असतात. परंतु काही प्रमाणात गटार व्यवस्था कोलमडल्यानंतर सामाजिक माध्यमातून काही नागरिक पंचायत मंडळावर टीका करत असतात. पंचायत मंडळ प्रत्येक प्रभागात आपापल्या भागातील भागातील गटार व्यवस्था साफसफाई करण्याचं काम पंचमंडळी कामगाराला घालून करत होती. त्यानुसार आपणही ते काम करून घेतले. परंतु अचानक काल रात्री आठ वाजता आपल्याला एक फोन आला की घरी पोलीस जमले, म्हणून त्यावेळी आपण पेडणे येथे एका वकिलाच्या मिटींगला उपस्थितीत होतो. त्यावेळी पोलिसांनी सांगितलं काय गुन्हा केला? पोलिसांनी सांगितले तुमच्या विरोधात तक्रार नोंदवली गेली .तुम्ही आताच घरी या नाहीतर आम्हाला तुम्ही आहात त्या ठिकाणी यावं लागेल. परंतु आपण त्याच वेळी काम आटपून पोलीस स्टेशनवर गेलो. त्यानंतर आपली जबानी घेण्यात आली. आणि आपली सुटका केली. परंतु आपण ज्या पद्धतीने काम केलं आहे. त्यात कुठलंही गैर काम केलं नाही.
पोलिसांनी आपलं काम केलेलं आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने ज्या पद्धतीने आपल्यावर तक्रार दिलेली आहे .खर म्हणजे अगोदर पोलिसांनी आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन त्या प्रकाराचा पंचनामा करणे आवश्यक होते. चौकशी करणे आवश्यक होते. आणि त्यानंतर पुढील कार्यवाही करणे हे त्यांचे कर्तव्य ठरत होते. परंतु तसं न करता थेट आपणास पोलीस स्टेशनवर बोलावून अटक केली. आणि जामीन पात्र गुन्हा असल्यामुळे लगेच आपली सुटका करण्यात आली.
मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांना धन्यवाद
एडवोकेट अमित सावंत यांनी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांना धन्यवाद दिले .कारण सार्वजनिक बांधकाम खाते हे त्यांच्याच कडे आहे. आणि तेच मुख्यमंत्री असल्याने त्यांच्याकडे ग्रह खाते आहे. आणि अशा तक्रारीची दखल घेऊन आपणास अटक करण्याची जी प्रक्रिया झाली आणि सरकारने करून दाखवली त्याबद्दल आपण मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांना धन्यवाद देतो असे एडवोकेट अमित सावंत म्हणाले.










